कराडच्या पत्रकारांसाठी गोरख तावरेंची निवड अभिमानास्पद : शशिकांत पाटील

कराड | मराठी पत्रकारितेत कराडचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. राज्यातील कानाकोपऱ्यात कराडचे पत्रकार सकारात्मक काम करत आहेत. कराडला महाराष्ट्र संपादक परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदाच गोरख तावरे यांना शासनाच्या अधिस्विकृती समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली. गोरख तावरे यांची निवड ही कराडच्या पत्रकारांसाठी अभिमानास्पद असल्याचे गाैरवोद्गार दैनिक प्रितीसंगमचे संपादक व जेष्ठ पत्रकार शशिकांत पाटील यांनी काढले.
गेल्या 35 वर्षापासून गोरख तावरे दैनिक सामनासाठी प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्र संपादक परिषदेच्या कार्यकारणीत सदस्य म्हणून काम करत आहेत. त्याची राज्य शासनाच्या पुणे विभागीय अधिस्विकृती सदस्य निवडीबद्दल कराड येथे पत्रकारांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन शिंदे, सतिश मोरे, प्रमोद सुकरे, संभाजी थोरात, हेमंत पवार, देवदास मुळे, विकास भोसले, अभयकुमार देशमुख, प्रमोद तोडकर, अमोल चव्हाण, अशोक मोहने, चंद्रजित पाटील, संदीप चेणगे, अस्लम मुल्ला, सकलेन मुलाणी, विकास साळुंखे, हरूण मुलाणी, सुलतान फकिर, विशाल पाटील आदी उपस्थित होते.
देवदास मुळे म्हणाले, कराडला पहिल्यांदाच अधिस्विकृती सदस्यपद मिळाले आहे. तेव्हा येणाऱ्या आगामी काळात पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. कराडचे पत्रकार एकसंघ रहावेत, यासाठी आगामी काळात आम्ही जेष्ठ एकत्रित येवून एक दिशा देण्याचा प्रयत्न करू.
गोरख तावरे म्हणाले, राज्य शासनाने केलेली हि नियुक्ती पत्रकारांना अधिस्विकृती देण्यात यावी, यासाठी नेमणूक केली आहे. आगामी तीन वर्षाच्या काळात सर्वाधिक अधिस्विकृती पत्रकार करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असले. कराडच्या पत्रकारांनी मला नेहमीच साथ दिल्याने हा प्रवास करत आलो आहे. आजची निवड केवळ माझीच नव्हे तर कराडच्या पत्रकारांचीच निवड असल्याचे मी समजतो.
अक्षय म्हस्के व हरूण मुलाणी यांना सन्मानपत्र
कराड शहरात गेले 25 वर्ष फोटोग्राफर, पत्रकार म्हणून काम करणाऱ्या अक्षय म्हस्के व व्हिडिअोग्राफर म्हणून प्रसिध्द असलेले पत्रकार हरूण मुलाणी यांचा वाढदिवस कराडच्या पत्रकारांनी एकत्रित येत साजरा केला. तसेच दोघांनाही एक सन्मानपत्र देवून गाैरविण्यात आले.



