सातारा जिह्यात स्वच्छ सुंदर वहागावची शाळा : गावात शालेय विद्यार्थ्याची मिरवणूक
कराड | सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित स्वच्छ सुंदर उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा स्पर्धेत वहागावच्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेने संपूर्ण सातारा जिल्ह्यातून 2 हजार 690 शाळांमधून तृतीय क्रमांक मिळवला. पुरस्कार विजेत्या शाळांना राज्याचे माजी मंत्री आमदार महादेव जानकर, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपशिक्षणाधिकारी चोपडे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पुरस्कार व सन्मानचिन्ह देण्यात आले.
वहागावच्या शाळेचा पुरस्कार सरपंच संग्राम पवार, उपसरपंच शीला पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रोहिणी नलवडे, मुख्याध्यापक अंजली कुंभार यांनी स्वीकारला. यावेळी शिक्षका सुवर्णा पाटील, पवार मॅडम, रेपाळ मॅडम, राऊत मॅडम, वीरकर मॅडम, ग्रामपंचायत सदस्य धनंजय पवार, संतोष कोळी, हनुमंत शिंदे, आनंदी पवार, रंजना पवार, शुभांगी पवार, तसेच बाळकृष्ण पवार, भिकाजी पवार, धर्मराज शिंदे, अतुल पवार, अनिकेत पवार, संभाजी पारवे, संदीप पवार, कृष्णा पवार, संजय पवार, बाबुराव शिंदे, नितीन ताटे, सचिन माने, भाऊ शिंदे व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेला मिळालेल्या या पुरस्काराची संपूर्ण वहागाव गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी या पुरस्काराचे तसेच शालेय विद्यार्थ्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.