Karad News : भरदिवसा गोळ्या घालून खून करणाऱ्या संशयितास कोर्टाकडून 9 वर्षांनी जामीन मंजूर

कराड | तब्बल नऊ वर्षापूर्वी जखिणवाडी येथे भरदिवसा गोळ्या घालून खून करण्यासह विविध गुन्ह्यात मोक्का लागलेल्या टोळीचा प्रमुख दीपक पाटील याला उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मकरंद कर्णिक जामीन मंजूर केला. ॲड. अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. त्यावेळी नऊ वर्षा पासून संशयीत तुरुंगात आहेत. मात्र, अद्यापही खटला सत्र न्यायालयात प्रलंबित आहे, असा युक्तीवाद करत ती गोष्ट लक्षात आणून दिल्याने जामीन मंजूर झाला.
जखिणवाडी येथे 9 जून 2014 रोजी शहरात मयूर गोरे याचा भर दिवसा गोळ्या घालून खून झाला होता. त्या प्रकरणात दिपक पाटील मुख्य संशयीत आहे. त्याच्या विरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल आहे. त्याच्यासोबत वैभव माने सहआरोपी आहे. अनेक बाबी तपासात निदर्शनास आल्या होत्या. त्यानुसार त्या टोळावर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती. त्या टोळी प्रमुख दिपक पाटील होता. त्याने उच्च न्यायालयातील दाद मागितली होती. बचाव पक्षातर्फे ॲड. अनिकेत निकम यांनी काम पाहिले होते.
ॲड. निकम यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. यावेळी नऊ वर्षा पासून संशयीत तुरुंगात आहे. मात्र, अद्याप खटला सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. साक्षीदारांच्या जबाबातही विसंगती आहे. अशी बाजू ॲड. निकम यांनी मांडली. तो युक्तिवाद ग्राह्य धरत एखादा खटला खुप काळ प्रलंबित असेल तर संशयीताच्या संविधानिक अधिकारांचा भंग होतो. या योग्य अटींवर जामीनावर सोडता येते. त्यानुसार न्यायमूर्ती कर्णिक यांच्या खंडपीठाने ॲड. निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत पाटीलला अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला.