मसूरला भाजपचा जल्लोष : चंद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्रावर लँड केल्याने पंतप्रधान मोदी आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन

मसूर प्रतिनिधी गजानन गिरी
भारताने चंद्रावर चंद्रयान 3 यशस्वीरित्या लँड करून इतिहास रचला त्या आनंदप्रित्यर्थ भाजपच्या वतीने मसूरला जुन्या बसस्थानक मुख्य चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्व शास्त्रज्ञांचे भारतवासीयांचे अभिनंदन करण्यात आले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान 3 उतरवणारा जगात भारत पहिला देश ठरला. भारताने इतिहास घडविला. चंद्रावर भारताचा तिरंगा फडकला. ही गोष्ट सर्व भारतीयांसाठी अभिमानाची ठरली. भाजपतर्फे मसूरला उत्साहात जल्लोष करण्यात आला. शास्त्रज्ञांचे घोषणा देत अभिनंदन करण्यात आले.
यावेळी कराड उत्तरचे नेते मनोजदादा घोरपडे, रामकृष्ण वेताळ, भाजपचे कराड उत्तर तालुका अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हा सचिव दिपाली खोत, कराड उत्तर तालुका उपाध्यक्ष जयवंत जगदाळे, ओबीसी तालुका अध्यक्ष सुनिल दळवी, किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष बिपिन जगदाळे, गोरक्षक संदीप बाबर, डॉ. रमेश लोखंडे, सागर पुरोहित, बापुसो लोहार, बाबुराव चौधरी, मगबुल फकीर, नवीन जगदाळे, राजेन्द्र लोहार, अतुल जगदाळे, सुमित शहा, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मनोजदादा घोरपडे म्हणाले, भारताने चंद्रयान तीन चंद्रावर उतरवून जगात डंका वाजवला. जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ कामगिरी ठरली.अंतराळात चंद्रयान उतरवणाऱ्या परिश्रम घेणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन.
रामकृष्ण वेताळ म्हणाले, बुधवारचा दिवस हिंदुस्तानचा ऐतिहासिक दिवस ठरला. चंद्रयान तीनचे दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग झाले. शास्त्रज्ञांचे परिश्रम कामी आले. चंद्रयान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. हे अभिमानास्पद आहे. शास्त्रज्ञांचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन.



