काॅंग्रेसचे कराड उत्तरचे अध्यक्ष निवासराव थोरात यांचा पाठपुरावा : वाघेरी ग्रामपंचायत कार्यालयासाठी 23 लाखाचा निधी
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील वाघेरी ग्रामपंचायत कार्यालयाचे विस्तारीकरण कोरोनाच्या कालावधीत वाघेरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या विस्तारीकरण कामासाठी निधीची मागणी होत होती. या मागणीवरून कॉंग्रेसचे कराड उत्तर अध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य निवासराव थोरात यांनी पुढाकार घेऊन जनसुविधा योजनेंतर्गत 2018-2019 या कालावधीत विशेष प्रयत्नातून 10 लाख रुपये व विधानपरिषद आमदार आ. मोहनशेठ कदम यांच्या माध्यमातून जनसुविधा योजनेंतर्गत 2021-2022 मध्ये 10 लाख आणि महाराष्ट्र शासनाच्या 2515 योजनेमधून 3 लक्ष रुपये असा एकूण रु. 23 लाखचा भरघोस निधी मिळवण्यात यश मिळवले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) व मा. आ. मोहनशेठ कदम (विधानपरिषद सदस्य) यांच्याकडे कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष निवासराव थोरात यांनी सततचा पत्रव्यवहार, पाठपुराव्यातून वाघेरी ग्रामपंचायत कार्यालयाचा विस्तार करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्याचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. वाघेरी गावच्या दृष्टीने ग्रामपंचायत कार्यालय अत्यंत महत्वाचे होते, मागील काही वर्षे प्रलंबित राहिलेले काम निवासराव थोरात यांनी मार्गी लावल्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी वाघेरीचे सरपंच मज्जीद पटेल, माजी पंचायत समिती सदस्य दीपक लिमकर, बाळासाहेब भोसले, कराड उत्तर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रवीण वेताळ, सुर्लीचे माजी सरपंच दत्तात्रय वेताळ, वडोली निळेश्वरचे ग्रा. पं. सदस्य निलेश पवार, करवडी ग्रा. पं. सदस्य युवराज कुंभार, राजू पवार, कराड उत्तर युवक काँग्रेसचे सरचिटणीस शहानूर देसाई, इस्माईल मुल्ला, सतीश पाटोळे, मकबूल मुल्ला, रफिक पटेल, संभाजी डांगे, कृष्णत कदम, बालम मुल्ला, असिफ मुल्ला, साजिद मुल्ला, नजीर पटेल, फिरोज मिस्त्री,रफिक मुल्ला यांच्यासह वाघेरी ग्रामस्थ उपस्थित होते.