Cricket : एकाच चेंडूवर षटकार अन् आऊटही

हॅलो न्यूज स्पोर्टस। इंग्लडमध्ये एका क्रिकेट सामन्यात एक मेजशीर किस्सा घडला. एकाच चेंडूवर फलंदाजांला षटकार दिला अन् आऊटही दिल्याचा प्रकार समोर आला आहे. इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन वनमध्ये मिडिलसेक्स आणि वॉरिकशॉयर यांच्यातील सामन्यावेळी हा किस्सा पहायला मिळाला.
मिडिलसेक्सचा कर्णधार टॉबी रोलँड जोन्सने एका चेंडूवर षटकार मारला, पंचानी त्या चेंडूवर षटकारही दिला. फलंदाज टाॅबीचा आनंद काही क्षणच टिकला. या सामन्यात वॉरिकशॉयरच्या संघाला 22.5 षटकात 66 धावाच करता आल्या. मिडिलसेक्सचा कर्णधार पहिल्या डावात नवव्या क्रमांकावर फलंदाजील आला. त्यावेळी संघाची धावसंख्या 7 बाद 148 धावा अशी होती. जोन्सने एका चेंडूवर षटकार मारला. पंचांनी षटकार दिलाही होता. मात्र, त्याच चेंडूवर त्याला आऊटही देण्यात आला.
Out hit wicket?!
Toby Roland-Jones thinks he has planted the ball for six but knocks the bails off in his follow-through #LVCountyChamp pic.twitter.com/c0tJoutjr3
— LV= Insurance County Championship (@CountyChamp) July 25, 2023
जोन्सने षटकार मारल्यानंतर हिटविकेट
षटकार मारल्यानंतर हातातली बॅट स्टम्पला लागल्याने बेल्स खाली पडल्या. त्यामुळे तो हिटविकेट बाद झाला. आता याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिडिलसेक्सने पहिल्या डावात 199 धावा केल्या. त्यांना पहिल्या डावात 139 धावांची आघाडी मिळाली. मिडिलसेक्सला सामना जिंकण्यासाठी 94 धावा हव्या होत्या. त्यांनी 2 गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं.