दोन्ही राजेंची खल्लास करण्याची धमकी : साताऱ्यातील राड्यात 130 जणांवर गुन्हा

सातारा | सातारा बाजार समितीच्या जागेवरून बुधवारी झालेल्या राड्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी 130 जणांवर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये खल्लास करण्याची धमकी दिल्याचे दोन्ही गटातील तक्रारदारांनी म्हटले आहे. त्यामुळे आता हा वाद चांगलाच पेटला आहे.
“माझ्या मालकीची जमीन असून परत पाय ठेवला तर पाय काढून खल्लास करीन, अशी धमकी खा. उदयनराजे यांनी दिल्याची तक्रार आ. शिवेंद्रराजे समर्थक विक्रम पवार यांनी दिल्याने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासह 49 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर माझ्या शेतजमीनमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून मला आ. शिवेंद्रराजे यांनी ‘आमच्या कामामध्ये आडवे आला तर खल्लास करीन’ अशी धमकी दिली असल्याची तक्रार खा. उदयनराजे समर्थक संपत महादेव जाधव (रा. संभाजीनगर, सातारा) यांनी दिल्याने आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 81 जणांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आ. शिवेंद्रराजे भोसले समर्थक विक्रम पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून खा. उदयनराजे भोसले यांच्यासह विनीत पाटील, अजय मोहिते, सनी भोसले, अमोल तांगडे, पंकज चव्हाण, स्वप्नील घुसाळे, गणेश जाधव, पंकज मिसाळ, सतीश माने, जितेंद्र खानविलकर, सोमनाथ उर्फ काका धुमाळ, अभिजित मोहिते, समीर माने, राहूल गायकवाड, सुभाष मगर, किशोर शिंदे, कुणाल चव्हाण, नंदकुमार नलवडे, रोहित लाड, युनुस झेंडे, अनिल पिसाळ, काशिनाथ गोरड, संपत जाधव, शेखर चव्हाण, सौरभ सुपेकर, प्रवीण धस्के, सुनील काटकर, संदेश कुंजीर, सागर जाधव, अर्चना देशमुख, गितांजली कदम, रंजना रावत, अश्विनी गुरव यांच्यासह अनोळखी 15 अशा एकूण 49 जनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
खा. उदयनराजे समर्थक संपत महादेव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आ. शिवेंद्रराजे भोसले, विक्रम पवार, मधुकर पवार, आनंदराव कणसे, अरुण कापसे, अमीन कच्छी, विजय पोतेकर, रमेश चव्हाण, राजेंद्र नलावडे, वंदना कणसे, शैलेंद्र आवळे, संजय पवार, अनिल जाधव, धनाजी जाधव, महेश गाड, धर्मराज घोरपडे, नामदेव सावंत, फिरोज पठाण. रवी ढोणे, कांचन साळुंखे, अविनाश कदम, रवी पवार, शेखर मोरे, दादा जाधव, निलेश पवार, बाळासाहेब पिसाळ, सुनील झंवर, नंदकुमार गुरसाळे, उत्तम नावडकर, अमित महिपाल, अमर मोरे, मिलिंद कदम, सुजीत पवार, शैलेश देसाई, पद्मसिंह खडतरे, गणेश साबळे प्रवीण शिंगटे, अरविंद जगताप, सूरज जांभळे, प्रतीक शिंदे, सागर साळुंखे, राहूल शिंदे, कुणाल मोरे, सुनील निकम, चेतन सोलंकी, अन्सार अत्तार, साईराज कदम, दीपक शिंदे, अभय जगताप (सर्व रा.सातारा शहर परिसर) व इतर 30 अनोळखी अशा एकूण 81 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.