उंब्रज पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार :- ऊसतोड कामगार आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर मध्ये वाद

उंब्रज प्रतिनिधी /श्रीकांत जाधव :- चरेगाव येथील ऊसतोड कामगार आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर यांच्यात झालेल्या भांडणाचे पडसाद हे जीवे ठार मारण्यापर्यंत शिगेला पोहचले होते. परतू दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला. आरोपी मकरंद गुलाब सूर्यवंशी यांचा ट्रॅक्टर ड्रायव्हर पाखऱ्या आणि ऊसतोड कामगार यांची भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून आरोपी सोन्या उर्फ ऋषिकेश गुलाबा सूर्यवंशी, मकरंद गुलबा सूर्यवंशी, (राहणार सूर्यवंशी मळा चरेगाव, पुंजाराम सुखदेव पाखरे सध्या रा. चरेगाव, मुळ राहणार पोकळवड तालुका जिल्हा जालना) आणि राज अंकुश आवळे राहणार खालकरवाडी यांनी स्कुटी,बुलेट आणि मोटरसायकल वर येऊन सोन्या उर्फ ऋषिकेश गुलाब सूर्यवंशी याने जीवे मारण्याचा उद्देशाने सिंगल बोर बंदुकीने जीवे मारण्याचा उद्देशाने फिर्यादीच्या अंगावर फायर केला.
फिर्यादीने बंदुकीचा बॅरल वर ढकल्याने तो राऊंड फिर्यादीच्या कानाजवळून गेला. मकरंद सूर्यवंशी व पुंजाराम पाखरे यांनी फिर्यादीच्या ऊसतोड कामगार मुकेश पतीराम पाटील यास हाताने व पायाने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ऋषिकेश सूर्यवंशी याने हवेत बंदुकीने चार राऊंड हवेत फायर करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच तुला आज जिवंत सोडत नाही अशी धमकीचा इशारा देऊन निघून गेले.
पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सौ. श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल ठाकूर यांनी श्री रवींद्र भोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक उंब्रज पोलीस स्टेशन यांना सदर गुन्ह्यातील आरोपींना शोध घेण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या. त्याप्रमाणे रवींद्र भोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस अंमलदार यांच्या साह्याने भवानवाडी, खालकरवाडी, चरेगाव या भागामध्ये पेट्रोलिंग करून आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन गुनह्याच्या तपास कामी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता,त्यांना ५ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे.



