ठरलं! शिवसेनेचे 15 आमदार बाद होणार अन् अजित दादा जाणार भाजपसोबत
हॅलो न्यूज | शिवसेनेचे 15 आमदारांचा निर्णय लवकर लागणार असून ते बाद होणार असून सरकार कोसळू नये, म्हणून राष्ट्रवादीचे अजित पवार भाजप बरोबर जाणार असल्याचे ट्विट आता समोर आले आहे. त्यामुळे राजकीय उलथापालथ पहायला मिळेल, असे ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांनी उद्योगपती अदानी यांच्याबाबत घेतलेली भूमिका ही काॅंग्रेसच्या सहमत नाही. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय हा महाविकास आघाडीला विचारात न घेता केल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले. आता त्यानंतर अंजली दमानिया केलेल्या ट्विटमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच
बघू…..
आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 11, 2023
अजित दादा यांच्या संबधित तसेच वारंवार चर्चेत नाव राहिलेला जरंडेश्वर कारखाना संदर्भात ईडीने कारवाईस सुरूवात केली असून मालमत्ता जप्त करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, यामध्येही आता अजित पवार तसेच सुनेत्रा पवार यांची नावे नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशाचवेळी अंजली दमानिया यांचे ट्विटला मोठे महत्व दिले जात आहे. सध्या सोशल मिडियावर हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
किळसवाणी राजकारण
मी पुन्हा येईन pic.twitter.com/mGY1k2720i
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 7, 2023