भगवे वादळ : कराडला शिवजयंतीला आ. नितेश राणेंनी दिला इशारा म्हणाले…

कराड | भारत देश आणि महाराष्ट्र हे हिंदूराष्ट्र त्यासाठीचा आजचा दिवस आहे. आमच्या हिंदूच्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहू नये, असा इशारा भाजप नेते नितेश राणे यांनी दिला आहे. कराड येथील हिंदू एकता आंदोलनच्या शिवजयंती निमित्त आयोजित दरबार मिरवणूकीत नितेश राणे सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी इशारा दिला.
कराड येथील शिवजयंतीनिमित्त आयोजित दरबार मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज यांची घोड्यावरील अश्वारूढ मूर्ती, श्रीराम व हनुमानाची मूर्ती लोकांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणूकीत घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांसह विविध वेशभूषा करून स्वार झालेले तरुण, तरुणी, काळजाचा ठोका चुकवणारी मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके, जय भवानी… जय शिवाजी यासह अन्य घोषणांचा अखंड जयघोष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध चित्ररथ, पारंपरिक वाद्ये, तुताऱ्यांची ललकारी अशा उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या पारंपरिक शिवजयंतीच्या दरबार मिरवणुकीने आज गर्दीच्या उच्चांकात इतिहास घडवला.
शहरातील पांढरीच्या मारुती मंदिरापासून सायंकाळी मिरवणुकीस पालखी पूजनाने हिंदू एकता आंदोलनाचे विनायक पावसकर, विक्रम पावसकर, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, सुभाष पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, जयवंत पाटील, अतुल शिंदे, हणमंतराव पवार, विद्या पावसकर, मुकुंद चरेगावकर, मनसेचे सागर बर्गे, दादा शिंगण, फारूख पटवेकर यांच्यासह माजी नगरसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.



