विजयनगर येथे दंत चिकित्सा व नेत्र तपासणी शिबीर
कराड | विजयनगर येथील प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालयात लायन्स क्लब कराड सिटी व कृष्णा हॉस्पिटल कराड यांच्या संयुक्त विद्यमाने दंत चिकित्सा व नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मानसिंगदादा पाटील मित्र परिवार, विजयनगर यांच्यावतीने प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालय, विजयनगर व जि. प. शाळा, विजयनगर येथील विद्यार्थी व पाडळी, केसे, मुंढे आणी बालाजीनगर ग्रामस्थ यांची मोफत दंत व नेत्र तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमास लायन्स क्लबचे ऍक्टिव्हिटी चेअरपर्सन नरेंद्र रोकडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी आमदार आनंदराव पाटील, मानसिंग पाटील, हनुमंतराव कराळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन संदीप कोलते,सचिवा लायन मंजिरी खुस्पे, खजिनदार लायन मीना कोलते, LCIF Coordinator महेश खुस्पे, झोन चेअरमन लायन सुशांत व्हाव्हळ, लायन शशिकांत पाटील, लायन राजश्री खराडे, माजी उपसरपंच विश्वासराव पाटील, विजयराव कदम, प्रल्हाद संकपाळ, नवनाथ यादव, शिवाजी जाधव, अर्जुन जाधव, नारायण जाधव, दादाराम माने, काशिनाथ जाधव, नागेंद्र कोरे, सुभाष संकपाळ, हनुमंत जाधव, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुर्वे मॅडम, श्री. जांभळे सर, प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती चव्हाण आदी उपस्थित होते.
मानसिंग पाटील म्हणाले, समाजात पुढाकार घेवून समाजिक उपक्रम राबविणाऱ्या लायन्स क्लबमुळे अनेकांना फायदा झाला आहे. आज आरोग्याकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे. या संस्थाना लागेल ती मदत आम्ही करू, अशी ग्वाही देतो.