ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारासोलापूर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले माऊलींच्या पालखीचे सारथ्य

सातारा । राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बरड ता.फलटण येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले आणि माऊलींच्या पालखीचे सारथ्य केले.

Brilliant Academy

यावेळी उपमुख्यमंत्री यांच्या समवेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपस्थित होते.

Kota Academy Karad

हरी नामाच्या गजरात आणि लाखो भाविक वारकऱ्यांसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी मजल दर मजल करत आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ आहे. माऊलींच्या पालखीचा आज सातारा जिल्ह्यातील बरड येथे मुक्काम असून उद्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker