मलकापूरमध्ये महाकुंभतीर्थ कलशाचे भाविकांनी घेतले दर्शन

मलकापूर / अनुगानी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) या संस्थेमार्फत कराड तालुक्यातील मलकापूर येथे प्रयागराज येथून आणलेला महाकुंभतीर्थ कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. अनुलोम भागप्रमुख सुहास कळसे यांच्या मार्फत शास्ञीनगर येथील माता काळूबाई व म्हसोबा देवस्थान मंदिर येथे भाविकांना दर्शनासाठी हा कलश ठेवण्यात आला.
यावेळी परिसरातील विविध जातीधर्मांच्या ११ जोडप्यांमार्फत कलशाचे पूजन करुन सार्वजनिक महाआरती करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी देशमुख, देवस्थानचे अध्यक्ष शंकरराव सोनवले,सुर्यकांत पाटील, रामेश्वर आळसे महाराज, विलासराव साळुंखे,मुरलीधर शिंदे, आण्णा डिसले, सुनिल मगदुम,सुरज बांडगी,मंगेश सुरवसे, तेजस सोनवले,किशोर नांगरे,संदिप शिंगण,किरण रोकडे,शुभम मडके,अविनाश पाटील, संकेत शिंगण, तानाजी रांजणे,विठ्ठल थोरात,मल्लिकार्जून करपे, नंदकुमार गायकवाड, रुषीकेश सुरवसे, बजीरंग गोडगे, अनुलोमच्या आयामातील नागरिक, वारकरी, महिला भगीनींची बहुसंख्येने उपस्थिती होती.