“डिजिटल इंडिया सप्ताह-2023” : कराडच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पोलिसांचे सायबर सिक्युरिटी बाबत व्याख्यान
– विशाल वामनराव पाटील
आज तंत्रज्ञानात मोठा बदल झाला असून दररोज त्यामध्ये काहींना काही फिचर्स येत आहेत. या बदलत्या तंत्रज्ञाची परिपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याचा वापर करू नये. कारण सायबर सेलकडे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्राॅनिक्स वस्तू, अॅप यांच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या तक्रारी येत असतात. तेव्हा तरूणांनो चुकीच्या गोष्टींना बळी पडायचे नसेल तर आपण वापरत असलेल्या गोष्टीबद्दल माहिती घ्या, त्याची खात्री करा अन्यथा एखादी चूक महागात पडू शकते. तेव्हा आपल्याकडून किंवा दुसऱ्याकडून गुन्हा घडू नये, यासाठी प्रत्येक गोष्टीत काळजी घेणे गरजेचे असल्याचे सातारा सायबर विभागाचे पोलिस काॅन्सटेबल अजय जाधव यांनी सांगितले.
कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन ” सायबर सिक्युरिटी” (Cyber security) या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी गुरुप्रसाद बुर्गे, अमित झेंडे, पाॅलीटेक्नीक काॅलेजचे प्राचार्य राजेंद्र पाटील, सुजाता पाटील व काॅलेजमधील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयीन तरूण वर्गाकडून नकळत होणारे गुन्हे टाळण्यासाठी व आजच्या युवा पिढीला नवीन तंञज्ञानाची ओळख करून देण्यासाठी या व्याख्याने आयोजन करण्यात आले होते.
“डिजिटल इंडिया सप्ताह-2023”
इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र, यांनी शासकीय तंत्रनिकेतन कराड या संस्थेस पाठवलेल्या पञानुसार 25 जुलै 2023 ते 31 जुलै 2023 हा आठवडा ” डिजिटल इंडिया सप्ताह-2023″ (Digital India week-2023) म्हणून कराड येथे साजरा करण्यात येणार येत आहे.