ताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रराज्यसातारासामाजिक

पाटणला मुस्लिम समाजातर्फे गोरगरिबांना अन्नधान्य कीट वाटप

पाटण | पाटण शहर हे सर्वधर्मसमभावाचे एक उत्तम उदाहरण आहे. शहरात धर्म, जात, पात न मानता गेल्या कित्येक वर्षापासून येथील हिंदू व मुस्लिम समाज एकमेकांच्या सुख, दु:खात सहभागी होवून सण, उत्सव गुण्यागोविंदाने साजरा करतात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे आषाढी एकादशी व बकरी ईद या सणांचे औचित्य साधून अल अमान बैतुल माल कमेटी पाटण (रामापूर) व मुस्लिम समाजातर्फे गोरगरीब गरजूंना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत राबविलेल्या उपक्रमाचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मंगल कांबळे, उपनगराध्यक्ष सागर पोतदार, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी संचालक शंकर उर्फ बाळासाहेब शेजवळ, शिव अल्पसंख्याक सेना महाराष्ट्र राज्य पाटण तालुकाध्यक्ष इरफान सातारकर, पाटण अर्बन बॅंकेचे संचालक अशोक गजरे, माजी उपनगराध्यक्ष विजय उर्फ बापू टोळे, सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार, फारूख मोकाशी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इकबालभाई गडकरी व हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते.

जामा मस्जिदचे इमाम हाफिज अल्ताफ यांनी अल अमान बैतुल माल कमेटीचे कार्य विषद करताना अल अमान बैतुल माल कमेटी तर्फे गरजूंना विविध प्रकारची मदत केली जाते. अन्नधान्य, औषधोपचार, शैक्षणिक साहित्य व वेळप्रसंगी आलेल्या
अडचणी या कमेटी मार्फत सोडविल्या जातात. मागील महिन्यात वाशिम जिल्ह्यातून आलेल्या लोकांना त्यांची अडचण समजून घेऊन त्यांना आर्थिक मदत करून त्यांना त्यांच्या जिल्ह्यात मार्गस्थ केले. आषाढी एकादशी व बकरी ईदच्या निमित्तानेही समाजातील गोरगरीब लोकांना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी बोलताना अशोकराव गजरे म्हणाले, रामापूरला कै. जैनुद्दीन शाहीर यांचा वारसा लाभला आहे. आमचे वडील कै. अनंत गजरे, महंमदभाई इनामदार, दगडू पवार, हुसेन गडकरी (बाबाजी), गजानन खटावकर, बशीर कोतवाल ही दिग्गज मंडळी कै. जैनुद्दीन शाहीर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती. तोच वारसा आजच्या तरूण पिढीला आहे याचा आम्हाला अभिमान आहे. पाटण-रामापूरमध्ये पूर्वीपासून जे सर्वधर्मसमभाव चालून आले आहे ते शेवटपर्यंत टिकून राहणार यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपनगराध्यक्ष सागर पोतदार यांनी मुस्लिम समाजाच्या चालत आलेल्या चाली, रूढींवर मार्गदर्शन केले. इस्लामची पाच तत्वे इमाम, नमाज, रोजा, जकात व हज यावर विस्तृत भाषण केले. विजय (बापू) टोळे यांनी कमेटी करत असलेल्या कामांची प्रशंसा केली व भविष्यात या कमेटीला जर काही मदत लागली तर ती आवश्य करू, असे आश्वासन दिले. कमेटीचे अध्यक्ष जुनेद गडकरी यांनी आपल्या सभोवताली जर कोणी गरजवंत असेल तर त्याची माहीती कमेटीला कळवा. त्यांना निश्चितच कमेटीमार्फत मदत करू, असे सांगून उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास कमेटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव खजिनदार व सर्व सदस्य व सर्व मुस्लिम समाजातील नागरीक उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker