कराड तालुक्यात 21 गावात डीजे/ डाॅल्बी वाजणार न्हाय
कराड :- गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळे मोठ्या प्रमाणावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. गणेश आगमन आणि विसर्जनासाठी पारंपारिक वाद्यांसह डीजे, डाॅल्बी या कर्णकर्कश वाद्यांचाही वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 21 गावांनी डाॅल्बी, डीजेला स्वयःपूर्तीने वाजणार नसल्याचे सांगितले आहे.
कराड तालुक्यात ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण 742 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. घरगुती गणपती संख्या 15 हजार 500 आहे. पोलीस ठाणे हद्दीतील 130 गावांची संख्या असून तालुका पोलिसांकडून रोज 5 ते 6 बैठका चालू आहेत. आतापर्यंत 27 गावात बैठका पार पडल्या असून त्यापैकी 21 गावांनी गावात सर्वानुमते डीजे/डॉल्बी लावणार नाही, असे सांगितले आहे.
पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप म्हणाले, डी.जे/डॉल्बी लावण्यास परवानगी नाही.
तसेच अनंत चतुर्थी नंतर गणपती विसर्जनास परवाणगी दिली जाणार नाही. गणेशोत्सवा दरम्यान कोणीही हुल्लडबाजी करु नये, अफवांवर विश्वास ठेवु नये. कोणत्याही जातीय धार्मिक वाद निर्माण होतील असे वर्तन करु नये अन्यथा उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत. प्रत्येक पोलीस अंमलदार यांचेकडे पोलीस ठाणे हद्दीतील गावे दत्तक देण्यात आलेली आहेत. जेणेकरुन त्यांचे त्या गावात वैयक्तीक लक्ष राहील.
खालील 21 गावात डाॅल्बी- डीजे वाजणार नाही
वडगाव हवेली, वसंतगड, तारुख, आणे, उत्तर तांबवे, म्हारुगडेवाडी, विठ्ठलवाडी, शेवाळवाडी- येवती, अकाईचीवाडी, टाळगांव, माटेकरवाडी, शेळकेवाडी- म्हासोली, घराळवाडी, चोमरमारवाडी, जिंती, शेवाळवाडी, येणपे, धोंडेवाडी, पाचुपतेवाडी, येणके, पार्ले, भुरभूशी या ठिकाणी डाॅल्बी- डीजे वाजणार नसल्याचे सांगितले आहे.