अहमदनगरकृषीकोल्हापूरखेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगमुंबईराज्यसांगलीसातारासोलापूर

कोळे मैदानात सुपनेची टिटवी- सुंदर बैलजोडी महाराष्ट्र केसरी

घाडगेनाथ देवाच्या यात्रेनिमित्त मैदान

तानाजी देशमुख / कराड :- कराड तालुक्यातील मौजे कोळे येथील श्री संत गाडगेनाथ महाराजांच्या याञेनिमित्त पारंपारिक असे महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचे यशस्वी आयोजन समस्त ग्रामस्थ कोळे यांच्या वतीने करण्यात आले होते.

सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबईसह पंचक्रोशीतील हजारो शर्यत शौकिनांच्या उपस्थितीमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार यशस्वीपणे पार पडला. या शर्यतीत 600 हून अधिक बैलगाड्या नोंदवल्या. एकूण 77 राऊंड पार पाडले.

बैलगाडी शर्यत विजेते पुढीलप्रमाणे :- सुपनेच्या देवांश पाटील यांच्या गाडीने मानाचा प्रथम क्रमांकाचा महाराष्ट्र केसरी पटकावला. विजेत्या स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे अनुक्रमे द्वीतीय क्रमांक आईसाऊबाई प्रसन्न देवराष्ट्रे, तृतीय आईगावदेवी प्रसन्न सोनाली एंटरप्राईजेस चरेगाव ,चतुर्थ श्री सिध्दनाथ प्रसन्न कराड, पंचम आईजाकुबाई प्रसन्न मुळशी, सहावा संग्राम उदसिंह पाटील ओगलेवाडी, सातवा बाबुशेठ माने घरणीकी, आठवा नाथसाहेब प्रसन्न लोणंद कोरेगाव, श्रीनाथ प्रसन्न अभयचीवाडी या गाडीने नववा क्रमांक पटकावला.

विजेत्या गाडीला रोख रक्कम मानाचा पोशाख व चषक देण्यात आले.या शर्यतीच्या यशस्वी आयोजनासाठी कोळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले,

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker