काले येथील श्री गुरूकृपा ज्वेलर्समध्ये दसरा- दिवाळीनिमित्त ”सुवर्ण संचय भिशी योजना”
कराड | कराड तालुक्यातील काले येथील श्री गुरुकृपा ज्वेलर्स (Shree Gurukripa Jewellers Kale) यांच्याकडून दसरा- दिवाळी सणानिमित्त सुवर्ण संचय भिशी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये सोने हप्त्यावरती खरेदी करता येणार आहे. शहरासोबत ग्रामीण भागातील लोकांसाठी ही योजना म्हणजे बचतीचा मार्ग असल्याचे श्री. गुरूकृपा ज्वेलर्सचे प्रोप्रा. चंद्रकांत सूर्यवंशी- हुपरीकर यांनी सांगितले.
कराड तालुक्यासह काले, ओंड, उंडाळे, वाठार, रेठरे, नांदलापूर भागातील ग्राहकांसाठी श्री गुरूकृपा ज्वेलर्स काले यांच्याकडून 11 महिने हप्ता भरणाऱ्या ग्राहकास 12 महिन्याच्या रक्कमेच्या हप्त्याचे सोने मिळणार आहे. सुवर्ण संचय योजनेत 500 रुपयांपासून 3 हजार रुपये पर्यंत किंवा त्याहून अधिक रक्कमेची भिसी सुरू करण्याची सुवर्णसंधी आहे. दसरा- दिवाळीच्या सणानिमित्त सोने खरेदी करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असून वेगवेगळे सोने व चांदीचे अलंकार श्री गुरूकृपा ज्वेलर्समध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
काले येथील कर्मवीर चाैक, नविन एसटी स्टॅण्ड परिसरात श्री गुरूकृपा ज्वेलर्स असून याठिकाणी विविध डिझाईनमध्ये सोने- चांदीचे अलंकार उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या डिझाईन बनवून देण्यात येणार आहेत. सुवर्ण संचय योजनेत ग्राहकाने दर महिना 3000 रूपये गुंतवल्यास 11 महिन्यांनी त्याचे 33 हजार रूपये होतात. परंतु, त्याला 36 हजार रूपयांचे सोने मिळणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी ग्राहकांनी दुकानाला भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.