ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा
Breaking News : कोयना धरण परिसरात आज पहाटे भूकंपाचा धक्का

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाराष्ट्राची भाग्यलक्षमी असलेल्य कोयना धरण परिसरात आज रविवारी पहाटे भूकंपाचा साैम्य धक्का जाणवला. पहाटे 3 वाजून 53 मिनिटांनी 3 रिश्टेल स्केलचा धक्का जाणवला असल्याचे कोयना सिंचन विभाग कोयनानगर यांनी सांगितले आहे.
पाटण तालुक्यात कोयना धरण परिसरात वारंवारं भूकंपाचे धक्के जाणवत असतात. आजही पहाटे एक भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही वित्तहानी झालेली नाही.
कोयनेपासून उत्तरेस 5 किमी अतंरावर भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू 30 किमी खोलवर झाला असल्याची नोंद झाली आहे.