ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसाताराहवामान

कोयना धरण परिसरात 3.2 रिश्टेल स्केलचा भूकंप : मध्यरात्रीची घटना

पाटण | कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला आहे. कोयना सिंचन विभागाने 3.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती दिली आहे.

कोयनानगर परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला असून या धक्क्यामुळे कोणतीही जिवीत किंवा वित्त हानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदु कोयना धरणापासुन 24 किलोमीटर वारणा खो-यात तर चांदोली गावाजवळ आहे. या भूकंपाचे हादरे कोयनानगर परिसरात जाणवले.

Earthquake Koyana Dam

या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नाही. तसेच लोकांनी भीती बाळगू नये, असे प्रशासनाने सांगितले आहे. कोयना धरण परिसरात तसेच चांदोली धरण परिसरात वारंवार भूकंपाचे साैम्य धक्के जाणवत असतात.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker