कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

कराड बाजार समिती निवडणूक : आ. पृथ्वीराज बाबांच्या एंन्ट्रीने उंडाळकरांना एकाकी पाडण्याचा डाव फसला

कराड | विशाल वामनराव पाटील
कराड बाजार समितीच्या (Karad Bazaar Committee) निवडणुकीत (Election) माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या एंन्ट्रीने उंडाळकर गटाला एकाकी पाडण्याचा डाव फसला. आता निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे, हे मात्र नक्की. त्यातच कराड उत्तरमधील भाजपच्या मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी उघडपणे आ. बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. 2009 साली झालेली महाआघाडी आता राहिली नसून केवळ आ. बाळासाहेब पाटील (MLA Balasaheb Patil) आणि भोसले गट एकत्रित निवडणुकीला सामोरे जात आहे.

Shree Furniture Karad- Patan

कराड बाजार समितीत आ. बाळासाहेब पाटील, स्व. संजय पाटील (आटकेकर), आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्तांतर घडवत 2009 साली खेचून आणली होती. 2015 साली पुन्हा बाजार समिती कै. विलासराव पाटील (काका) यांनी खेचून आपल्याकडे घेतली. सातारा जिल्हा बॅंकेत उदयसिंह पाटील यांच्या मतांची गोळा बेरीज असतानाही थोडक्या मतांनी पराभव झाला. आ. बाळासाहेब पाटील आणि उंडाळकर गटात या निवडणुकीमुळे चांगलेच राजकीय द्वंद पहायला मिळाले. जिल्हा बॅंकेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे त्यांचा फटका उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना बसल्याचेही बोलले जात आहे.

कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदार संघाचा विचार केल्यास दोन्ही नेत्यांना आमदारकीला एकमेकांची साथ लागते. आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचे कराड दक्षिण व उत्तरमध्येही कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे. तर आ. बाळासाहेब पाटील व डाॅ. अतुल भोसले यांचाही दोन्ही मतदार संघात कार्यकर्ते आहेत. विधानसभेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून आ. पृथ्वीराज चव्हाण बाजार समितीच्या निवडणुकीत थेट सहभाग घेणार नसल्याची चर्चा विरोधकांनी उठवली होती. त्यामुळे आता अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचा गट जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीप्रमाणे एकाकी पडणार असल्याचे बोलले जावू लागले होते. अशावेळी आ. पृथ्वीराज चव्हाणांनी पाचवडेश्वर येथील मेळाव्यास उपस्थिती लावून विरोधकांच्या चर्चांना पूर्णविराम दिलाच. परंतु नेतृत्वही करत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या काका गटाला एकटे पाडण्याचा डाव फसला असल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू आहे.

स्व. काकांच्या निधनानंतर पहिल्यादांच निवडणूक होत असल्याने विशेष महत्व या निवडणुकीला आहे. त्यातच काका- बाबा गटाच्या मनोमिलनानंतर दोन्ही गटाचे नेते एकत्रित येत निवडणुकीला सामोरे जात आहेत. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारांना भावनिक साद घालत बाजार समितीत विजय हीच काकांना श्रध्दाजंली ठरणार असल्याचे म्हटले आहे. कराड दक्षिणमधील राष्ट्रवादीचे नेते व कृष्णा साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, कराड उत्तरमधील भाजपाचे नेते मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांची साथ उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना राहणार असल्याने आता बाजार समितीच्या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.

खासदार श्रीनिवास पाटील यांची भूमिकाही महत्वपूर्ण
सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना मानणारा वर्ग कराड उत्तर व दक्षिण मतदार संघातही आहे. खा. पाटील यांचे संबध हे सर्वच पक्षासोबत तसेच व्यक्तिगतही असल्याचे सर्वश्रूत आहे. अशावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांची भूमिकाही महत्वपूर्ण ठरणार आहे. अनेकदा खा. पाटील हे थेट निवडणुकात सहभागी होत नाहीत. त्यामुळे ते या निवडणुकीत सहभागी होणार की पडद्या आडून कोणाला मदत करणार की तटस्थ राहणार याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker