पोदारमध्ये अग्निशमन प्रक्रियेचे प्रात्यक्षिक

कराड :- येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अग्निशमन प्रक्रियेचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. शाळेमध्ये सर्वप्रथम अग्निसुरक्षा आराखड्यानुसार घेण्यात येणारी फायर ड्रिल आयोजन करण्यात आली. फायर अलार्म वाजताच सर्व विद्यार्थी शालेय मैदानात दाखल झाले. अग्निशमन केंद्राकडून यावेळी उपस्थितांना अग्निशमन उपकरणे कशी वातरावीत तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीकांत देवघरे , विनोद कोटरे आणि कर्मचारी यांनी आग लागल्यानंतर घ्यावयाची महत्वाची पावले आग नियंञन कसे करावे.प्राथमिक मदत कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आणीबाणीच्यावेळी वापरण्यात येणारी विविध उपकरणे सादर केली. तसेच आग विजवण्यासाठी वापरल्या जाणार्या वेगवेगळ्या पाण्याच्या नळीचे प्रात्यक्षिक दाखवले आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन अधिकार्यांशी संपर्क कसा साधावा हे मुलांना समजावून सांगितले. यावेळी अग्निशमन गाडीचा वापर कसा केला जातो हे प्रत्यय अनुभवले माॅक संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. शाळेच्या उपप्राचार्य स्वाती नांगरे,यांनी अग्निशमन दलाचे आभार मानले.
शाळेचे प्राचार्य अन्वय चिवटे यांनी प्रात्याक्षिकानंतर शालेय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आग आणि इतर आपत्तीविषयी सजग राहण्याची आणि त्वरित योग्य कृती करण्याचे महत्व सांगितले.सदर संकटकालीन बचाव प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी शाळेचे प्राचार्य अन्वय चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य स्वाती नांगरे, शाळेचे प्रशासकिय व्यवस्थापक विशाल जाधव कार्यक्रमाच्या समन्वयिका मेघा पवार तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.