क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

पाटण तालुक्यात पुन्हा गोळीबार : लग्नाच्या मिरवणुकीत बंदुकीतून तीन फैरी झाडल्या

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
पाटण तालुक्यात आता किरकोळ कारणांवरून थेट बंदुकीतून गोळीबार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या 6 दिवसात 3 वेळा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. तळमावले (ता. पाटण) येथे लग्नाच्या मिरवणुकीत एका व्यक्तीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडल्या. तळमावले येथे गुरुवारी सकाळी 9:30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर एकच गोंधळ उडून गेला. तळमावले येथे हवेत गोळीबार करणाऱ्यास ढेबेवाडी पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या जवळील परवानाधारक बारा बोअरची रायफल व 10 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सार्वजनीक ठिकाणी बिनधास्त गोळीबार होवू लागल्याने कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसत आहे.

Shree Furniture karad

याबाबत ढेबेवाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाटण तालुक्यातील तळमावले येथे काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या गेटसमोर एका लग्नाची मिरवणूक सुरु होती. लग्नाच्या मिरवणुकीवेळी एका व्यक्तीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडल्या. यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पाटणचे डीवायएसपी विवेक लावंड यांच्यासह ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी गोळ्या झाडणाऱ्या जितेंद्र जगन्नाथ कोळेकर वय 51, रा. तळमावले) याला ताब्यात घेतले. तळमावले येथील जितेंद्र कोळेकर याच्याकडे स्वसंरक्षणाची परवानाधारक बारा बोअरची रायफल आहे. त्याने लग्नाच्या मिरवणुकीवेळी त्या रायफलचा गैरवापर करून हवेत 3 फ़ैरी झाडल्या.

सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर बंदुकीतून हवेत गोळीबार करत सार्वजनिक शांततेचा भंग केला. तसेच दहशतीचे वातावरण निर्माण करून इतरांच्या जीवास धोका निर्माण होईल.अशी कृती केली. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.

सातारा जिल्ह्यात आठवड्यात तिसऱ्यांदा फायरिंग
पाटण तालुक्यात रविवारी 19 मार्च रोजी माजी नगरसेवक मदन कदम यांने केलेल्या गोळीबारात 2 ठार तर 1 गंभीर जखमी, सातारा तालुक्यात एका माॅलमध्ये गुरूवारी 22 मार्च रोजी बंदुकीतून गोळी सुटून सेल्समन जखमी. तर काल शुक्रवारी 23 मार्च रोजी थेट लग्नाच्या मिरवणुकीत बंदुकीतून तीन फैरी झाडल्या. यामुळे सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था यांचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र दिसत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker