कोयना दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध : एक जागा रिक्त
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
माजी सहकारमंत्री स्वर्गीय विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असणाऱ्या कोयना दूध संघाची सन 2023- 24 ते 2028- 29 ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. पंचवार्षिक निवडणुकीत 17 जागांसाठी केवळ 16 अर्जच वैध ठरल्यामुळे सोळा जणांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली. तर एक जागा रिक्त राहिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक संदीप जाधव यांनी काम पाहिले.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवानेते अँड. उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोयना दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून वसंतराव जगदाळे, संपतराव इंगवले, सुदाम चव्हाण, शिवाजी शिंदे, लक्ष्मण देसाई, शिवाजी गरुड, शिवाजी जाधव, शंकर पवार, दीपक पिसाळ, तानाजी शेवाळे, धनाजी पाटील, अशोक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.
महिला प्रवर्गातून उज्वला माने, निता निकम, इतर मागासवर्ग प्रवर्गातून बाबुराव धोकटे, भटक्या जमाती प्रवर्गातून शिवाजी गावडे यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान अनुसूचित जाती जमाती गटातून तांत्रिक अडचणीमुळे एक जागा रिक्त राहिली आहे. सर्व नवनिर्वाचित संचालक यांचे युवा नेते ऍड उदयसिंह पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.