पाटण मतदार संघातील 12 गावांना 12 कोटी 25 लाखांचा निधी मंजूर
पाटण | पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेल्या गावातील नळ पाणी पुरवठा योजना या कालबाह्य तसेच जिर्ण झाल्याने या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत होती. पाटण विधानसभा मतदारसंघातील 12 गावातील नळ पाणी पुरवठा योजनांना शासनाचे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत 12 कोटी 25 लक्ष 53 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांद्वारे दिली आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघातील बेलदरे, म्होप्रे, गिरेवाडी, आडदेव, साबळेवाडी, वाडीकोतावडे, खळे, नवसरवाडी, नाडोली, माजगाव, वेताळवाडी व त्रिपुडी या गावांमध्ये नवीन नळ पाणी पुरवठा योजना होण्यासाठी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे विनंती केली होती. या योजनांना निधी मंजूर झाला असून निविदा निश्चित झाल्यानंतर जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची कामे हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी यांना केल्या असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
गावांना पुढीलप्रमाणे निधी
जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांमध्ये बेलदरे 45.15 लाख, म्होप्रे 177.41 लाख, गिरेवाडी 82.04 लाख, आडदेव बु व आडदेव खुर्द 188.65 लाख, साबळेवाडी 86.37 लाख,वाडीकोतावडे 53.83 लाख,खळे 98.77 लाख,नवसरवाडी 89.91 लाख, नाडोली 80.48 लाख, माजगाव 115.14 लाख, वेताळवाडी 120.75 लाख व त्रिपुडी 87.13 लाख या योजनांचा समावेश असून मंजूर झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या निविदा प्रक्रिया कार्यवाही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सुरु केली आहे.