ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा
साताऱ्यातील ‘या’ खास व्यक्तीला गाैतमी पाटीलने दिला ‘परफ्यूम’ भेट

सातारा | राज्यभरात तरुणांच्या मनात अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने सोमवारी साताऱ्यातील एका खास व्यक्तीची भेट घेतली. तसेच या व्यक्तीला परफ्यूम ही भेट दिला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गाैतमी पाटील या खूपच खूश असलेल्या दिसून आल्या. तसेच यावेळी त्यांनी पुढच्या महिन्यात घुगंरू चित्रपट येणार असल्याचेही सांगितले.
सातारा येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिर या निवासस्थानी गाैतमी पाटील हिने सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. तसेच पहिलीच भेट असून छ. उदयनराजे यांना आवडत असल्याने परफ्यूम भेट आणल्याचेही तिने सांगितले.
छ. उदयनराजे आमचे दैवत गाैतमी पाटील
माध्यमांशी बोलताना गौतमी पाटील म्हणाल्या, महाराजांना पहिल्यांदाच मी भेटले. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा. यासाठी मी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आले होते. आज माझे जरी मोठ्या प्रमाणावर चाहते असले तरी छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा मोठी नाही. त्यांची माझ्याबरोबर बरोबरी नको, ते दैवत आहेत.



