ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा
दहावीच्या निकालात मलकापूरच्या कन्याशाळेच्या मुलींनी मारली बाजी

मलकापूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींनी बाजी मारत कन्याशाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम कायम ठेवली व विद्यार्थिनींच्या यशाने कन्याशाळा मलकापूरचे गुणवत्तापूर्ण शिक्षण पुन्हा एकदा अधोरेखित केले.
कु. प्रगती मोहन शेळके हिने ९८ टक्के गुण मिळवून विद्यालयामध्ये प्रथम व मलकापूर केंद्रामध्ये 2 री येण्याचा बहुमान मिळवला. तर कु.आदिती पाटील ९४. ८० द्वितीय क्रमांक, कु.वैभवी साठे ९२% तृतीय क्रमांक, कु. गौरी पाटील ९०. ८० चतुर्थ क्रमांक,कु.श्रावणी शिंदे ८९. ८०पाचवा क्रमांक, प्रांजली खेडकर ८९.४० गुण मिळवून सहावा क्रमांक व कु. श्रुतिका वाडेकर ८७.६० गुण मिळवून सातवा येण्याचा बहुमान मिळवला.तसेच कु.प्रगती शेळके हिने गणित विषयात 99, विज्ञान विषयात 96 व समाजशास्त्र विषयात 98 गुण मिळवले.
एकूण ९७विद्यार्थ्यांनी परीक्षेत बसलेल्या होत्या त्यामध्ये विशेष प्राविण्यासह ३१ विद्यार्थिनी तर प्रथम श्रेणीसह ३९ विद्यार्थिनी व द्वितीय श्रेणीसह २४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या . या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक वृंदाचे संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग पाटील संस्थेचे उपाध्यक्ष भास्करराव पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ.स्वाती थोरात, संचालक प्रा. संजय थोरात, वसंतराव चव्हाण,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, समस्त पालक व विद्यार्थिनीनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
इयत्ता दहावी उत्कृष्ट निकाल परंपरा, ५वी व ८वी शिष्यवृत्ती, एन. एम. एम. एस शिष्यवृत्ती निकालाची उत्कृष्ट परंपरा,क्रीडा गुणांचा विकास यामुळेच इयत्ता ५वी ते १० मराठी व सेमी इंग्रजी माध्यमांसाठी विद्यालयात प्रवेशासाठी पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.इयत्ता दहावीच्या निकालाचे पालक वर्गातून विशेष कौतुक होत आहे..