साताऱ्याच्या प्राची देवकरला गोल्ड मेडल
कराड तालुक्यातील किरपे गावची कन्या
चेन्नई ः – साताऱ्याची कन्या प्राची अकुंश देवकर हिने (SAAF) साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत 3000 मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळवले. कराड तालुक्यातील किरपे गावची प्राची देवकर हिच्या यशामुळे किरपे गावासह कराड तालुक्यातील क्रिडा क्षेत्रात आनंद साजरा केला जात आहे. चेन्नई येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अवघ्या 9 मिनिट 57.20 सेंकद वेळेत गोल्ड मिळाले.
चेन्नई येथे 7 देशातील ज्युनियर आशियाई स्पर्धा सुरू आहे. किरपे गावची प्राची देवकर हीचे अतुल पाटील प्रशिक्षक आहेत. सध्या ती बेंगलोर येथे प्रशिक्षण घेत आहे. प्राची कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थींनी आहे. तसेच ती
आशियाई ज्युनियर स्पर्धेत प्राची देवकरने गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल प्रशिक्षक अतुल पाटील, क्रिडाप्रेमी सुनील बामणे, सलीम मुजावर, प्रकाश काटवटे, सरपंच प्रज्ञा देवकर, उपसरपंच विजय देवकर, पोलिस पाटील प्रविणकुमार तिकवडे, शंकरराव माने, अकुंश देवकर, कृष्णत माने, बजरंग कदम आदींनी तिचे अभिनंदन केले.