बारावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी भयमुक्त, निर्भीडपणे सामोरे जावे :- अशोकराव थोरात.
गुलाब पुष्प देऊन औक्षण करून परीक्षेस शुभेच्छा

मलकापूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ कोल्हापूर इ. 12 वी बोर्ड परीक्षा 2025 मलकापूरच्या आदर्श जूनियर कॉलेज व आ. च. विद्यालय मलकापूरच्या केंद्रावर आज सुरू झाल्या. त्यानिमित्त प्रातिनिधीक स्वरूपात केंद्रावरील व राज्यातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात, डॉ. सौ स्वाती थोरात यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
राज्यातील बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी भयमुक्त निर्भीडपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन शेतिमित्र अशोकराव थोरात यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. सौ. स्वाती थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन गुलाब पुष्प देऊन त्यांचे औक्षण करून परीक्षेस शुभेच्छा दिल्या.
तसेच तुळशीराम शिर्के, प्रा. संजय थोरात, मुख्याध्यापिका ए. एस. कुंभार, उपमुख्याध्यापक ए. बी. थोरात, पर्यवेक्षक बी. जी. बुरुंगले, विभाग प्रमुख सौ. एस. डी. पाटील, रमेश हिंगसे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, आ. च. विद्यालय व आदर्श जुनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक, प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.