क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रबिझनेसराजकियराज्यसातारा

खंडणीखोरांना पालकमंत्री शंभूराज देसाईंचा सज्जड दम म्हणाले…

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके 
जिल्ह्याची प्रगती होत असताना अपप्रवृत्ती समोर येत असतात. मी गृहराज्यमंत्री असताना अशा प्रवृत्तींना आळा घातला होता. औद्योगिक प्रगतीत काेणी अडथळा आणत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. या प्रवृत्ती मोडीत काढल्या जातील. जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीत अडथळा आणणाऱ्या आणि इंडस्ट्रियल परिसरात खंडणी गोळा करणाऱ्यांना पालकमंत्र्यांनी सज्जड दम दिला आहे. जिल्ह्याची प्रगती होत असताना अशा प्रवृत्ती समोर येत असतात. मी गृहराज्यमंत्री असताना अशा वृत्तींना आळा घातला होता. मात्र, अशा पद्धतीने कोणतेही औद्योगिक प्रगतीमध्ये अडथळा आणत असेल तर अशा प्रवृत्ती मोडीत काढू, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या भाषणात दिला आहे.

”मास’ औद्योगिक प्रदर्शन – 2023′ चे उद्घाटन मंत्री देसाईंच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते. व्यापीठावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले, मासचे जितेंद्र जाधव, राजेंद्र मोहिते, धैर्यशील भोसले, अस्लम फरास, उद्योजक नितीन माने, श्रीकांत पवार,वसंत फडतरे, दिलीप उटकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती हाेती. यावेळी मंत्री देसाई म्हणाले, एखादा उद्योग जिल्ह्यातून बाहेर गेला तर मोठे नुकसान होते. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्योग वाढले तर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. शासन उद्योग उभारणीसाठी सकारात्मक असून उद्योग वाढीसाठी नियमावलींमध्ये बदल केले आहेत. ‘मास’ ने भरवेल्या प्रदर्शनाचा लाभ होणार असून त्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. सातारा जिल्हा उद्योग क्षेत्रामध्ये राज्यात पुढे कसा येईल. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असेही पालकमंत्री देसाई यांनी सांगितले. जिल्ह्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी सर्व सोयी-सुविधांच्या उपलब्धतेबरोबरच आवश्यक सहकार्य राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही देसाईंनी दिली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील त्यांचे मनाेगत व्यक्त केले.

शंभूराज देसाई ड्रायव्हर सीटवर तर शिवेंद्रराजे बाजूला
साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर इंडस्ट्रियल एक्सपो 2023 चे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी एक्सपो मध्ये असणाऱ्या इंडस्ट्रियल स्टॉलची दोघांनी पाहणी करून माहिती घेतली. या पाहणी दरम्यान एका स्टॉलवर ट्रॅक्टरची पाहणी करत असताना. मंत्री शंभूराज देसाई स्वतः ड्रायव्हर सीटवर बसून स्टेअरिंग हाती घेत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना देखील ट्रॅक्टरच्या बाजूला असणाऱ्या सीटवर बसवले. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सोबतच स्टेरिंगच्या सीटवरच बसण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी मी बाजूच्या सीटवर बसतो असे सांगून ट्रॅक्टरची माहिती जाणून घेतली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker