क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कराड शहरात युवकांच्या दोन गटात जोरदार दगडफेक : 8 जण ताब्यात

कराड । शहरातील आंबेडकर पुतळा ते जोतिबा मंदिर जाणाऱ्या मार्गावर पालकरवाडा येथे रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास युवकांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. युवकांनी तलवारी नाचवत दगडफेक केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना न जुमानता युवक एकमेकांना भिडले. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अकरा जणांवर गुन्हा दाखल करून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ओमकार उर्फ अहमद सलीम शेख, करण शशिकांत काटरे, प्रज्वल तुळशीनंद कांबळे, अमोल बबन काटरे, हर्ष राकेश कांबळे, आशपाक सलीम शेख, जीवन दुर्योधन कांबळे, आकाश गंगाधर कांबळे (सर्वजण रा. बुधवार पेठ, कराड), अमन साजिद शेख, इरफान अश्रफ कच्छी आणि साहिल आलम मुजावर (सर्व रा. मंगळवार पेठ, कराड) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जोतिबा मंदिर जाणाऱ्या मार्गावर पालकरवाडा येथे रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास काही युवकांमध्ये मारामारी सुरू होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पेट्रोलिंग करणारे पोलीस पथक त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी दहा ते पंधरा युवक हातात तलवार घेऊन एकमेकांच्या दिशेने दगडफेक करीत शिवीगाळ, दमदाटी करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी युवकांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही युवक एकमेकांना मारहाण करीत होते. त्यामुळे अधिक पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. काही वेळातच पोलीस फौजफाटा त्याठिकाणी पोहोचला. आठ युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर इतर युवक पोलिसांना पाहताच तेथून पळून गेले. याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मारुती सराटे तपास करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker