ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमुंबईराजकियराज्यसामाजिक

मुंबईला 20 लाख लोक निघाल्याने अवजड वाहतूक बंद… कारण वाचा

हॅलो न्यूज | अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना शनिवारी (दि.16) महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award) सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे दि. 14 एप्रिल ते दि. 16 एप्रिल खारघर ते इन्सुली (सांवतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जूना राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर राज्य मार्ग वरुन 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त वाहनांची वाहतूक (अवजड) बंद राहणार आहे. याबाबतचा शासनाचे सहसचिव आदेश राजेंद्र होळकर यांच्या सहीनिशी काढण्यात आला आहे.

सदरच्या आदेशात म्हटले आहे की, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना शनिवारी (दि.16) महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदरचा गौरव सोहळा खारघर नवीमुंबई येथे असल्याने सदर कार्यक्रमाकरीता रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार वगैरे जिल्ह्यातून तसेच बाहेरील राज्यातून सुमारे 15 ते 20 लाख लोक खाजगी वाहनांने, एसटी बसेस तसेच रेल्वेने खारघर नवीमुंबई येथे येणार आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर चौपदरीकरणाचे कामकाज चालू असल्यामुळे सदर महामार्गावर बऱ्याच ठिकाणी बोटलनेक पॉईंट तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी असून दिनांक 15 एप्रिल व 16 एप्रिल रोजी शनिवार व रविवार अशा सलग 3 दिवस सार्वजनिक सुट्टी असल्याने नागरिक व पर्यटक मोठया संख्येने आपआपली वाहने घेवून सदर मार्गावरून प्रवास करणार आहेत. अशा वेळेस सदर मार्गावरून अवजड वाहतुक सुरु राहील्यास वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊन गंभीर प्रश्न उद्भवू शकतो.

त्यामुळे मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 115 मधील तरतुदींचा वापर करुन महाराष्ट्र शासन या आदेशाद्वारे खारघर ते इन्सुली (सांवतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जूना राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर राज्य मार्ग वरुन होणारी वाळू/रेती भरलेल्या ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत पुढीलप्रमाणे आदेश देत आहेत.

वरील निर्बंध दुध, पेट्रॉल-डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सीजन, औषधे व भाजीपाला इ. जीवनावश्यक वस्तू बाहुन नेणाऱ्या वाहनांना लागू होणार नाहीत. उपरोक्त महामार्ग / राज्य मार्ग च्या रस्तारुंदीकरण, रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य माल इत्यादी ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. तथापि, वाहतूकदारांनी सबंधीत वाहतूक विभाग/महामार्ग पोलीस यांचेकडून प्रवेशपत्र घ्यावे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker