हॅलो न्यूजचा आरती संग्रह : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

कराड | हॅलो न्यूज साप्ताहिक आणि वेबपोर्टलच्या आरती संग्रह- 2023 चे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जाहिरातदार व वाचकांसाठी आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आरती संग्रह घरोघरी पोहचला असून त्याचे गणेशभक्तांनी स्वागत केले. संपादक विशाल वामनराव पाटील यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण आणि आ. बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले.
सातारा जिल्ह्यातील वाचकांच्या पसंतीचे नंबर 1 वेब पोर्टल असलेल्या हॅलो न्यूजच्या आरती संग्रहात गणेश पूजन, देव- देवतांच्या आरती, अथर्वशीर्ष, श्री गणेश विसर्जन विधी आणि गाैरी गीते यांचा समावेश करण्यात आला आहे. या आरती संग्रह प्रकाशनला रयत कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, युवक काॅंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, अजित पाटील- चिखलीकर, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, गिताजंली थोरात, कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, माजी पंचायत समिती उपसभापती रमेश देशमुख, प्रा. धनाजी काटकर, झाकीर पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सरपंच भाग्यश्री देसाई, उपसरपंच सुधीर कांबळे, संतोष शिनगारे, सदस्या करिश्मा संदे, लतिफा फकीर, अर्जुन कराळे, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
कराड येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रकाश करण्यात आले. यावेळी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील (काका), कराड नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते साैरभ पाटील (तात्या), कराड तालुका युवकचे अध्यक्ष प्रशांत यादव, लेखक अभयकुमार देशमुख, युवानेते प्रमोद पाटील, शिवाजी पवार (तात्या) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या आरती संग्रहाला शिवस्नेह निधी बॅंक लिमिटेड, कला- गोविंद को- आॅप क्रेडिट सोसायटी- साकुर्डी पेठ, समर्थ प्राईड, राधिका धूप स्टिक, सुनिल बामणे मित्रपरिवार, श्री फर्निचर- वसंतगड, वसंतगड विकास सेवा ग्रामपंचायत सुपने, वस्ती साकुर्डी, कराड अर्बन बॅंक, सकस दूध संघ पाटण, स्वामीरत्न ज्वेलर्स- मल्हारपेठ, मळाई ग्रुप, प्लनेट काॅम्प्युटर, एल. के. कंट्रक्शन, कराड खरेदी-विक्री संघ,नॅशनल सायन्स गुरूकुल- चाफळ, मयुरेश्वर पंचकर्मायुर्वेद यांनी विशेष सहकार्य केले.