‘खेळ पैठणीचा’ होम मिनिस्टर कार्यक्रमास अलोट गर्दी
मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने महिलांसाठी खास कार्यक्रम

कराड प्रतिनिधी।सकलेन मुलाणी
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य व खटाव- माण साखर कारखान्याचे को- चेअरमन मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने महिला भगिनींसाठी खास ‘खेळ पैठणीचा खेळ मनोरंजनाचा’ होम मिनिस्टर कार्यक्रम बुधवारी सायंकाळी अभूतपूर्व उत्साही वातावरणात पार पडला. मनोरंजन व प्रश्नमंजुषा व विविध उपक्रमास महिला वर्गांची अलोट गर्दी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला.
दरम्यान चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवलेल्या नृत्यकलेत पारंगत असणाऱ्या अभिनेत्री दिपाली भोसले- सय्यद व अभिनेत्री भार्गवी चिरमुले तसेच निवेदक दीपक साबळे हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. या होम मिनिस्टर झालेल्या कार्यक्रमात सुमन महाडिक (निनाम), स्वाती ढाणे (पाडळी), अनिता घाडगे (फत्त्यापूर), माधवी मोहिते (नागठाणे), तनुजा संकपाळ (हेळगाव), संध्या सुतार (खोजेवाडी) या महिलांनी अनुक्रमे बक्षीसे जिंकत कार्यक्रमाचे सर्व महिलांच्या वतीने कौतुक करत आभार मानले. कार्यक्रमास पंचक्रोशी शिक्षण मंडळ रहिमतपूरच्या अध्यक्षा सौ. चित्रलेखाताई माने -कदम, तेजस्विनी महिला विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्षा सौ. संगीता शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलताई घोरपडे, पंचायत समिती सदस्य सौ. विजया गुरव, अर्चनाताई बर्गे, कार्यक्रमाचे संयोजक सौ. समता घोरपडे, सौ. तेजस्विनी घोरपडे, सौ. रिना घोरपडे यांच्यासह कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व महिला पदाधिकारी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी अभिनेत्री दिपाली सय्यद म्हणाल्या, मनोजदादा घोरपडे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून प्रत्येक माता-भगिनींना आपल्या भावाकडे माहेरी आल्यासारखं असं मनोमन वाटून महिलांची सर्व जेवणाची उत्तम सोय करून एका भावाची भूमिका समर्थपणे पेलली असल्याचे सांगून मनोजदादा घोरपडे हे येणाऱ्या निवडणुकीत आमदारच होणार असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.
यावेळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी मनोज दादा घोरपडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असेच सामाजिक विधायक उपक्रम राबविण्यासाठी तुम्हाला परमेश्वराने ताकद देऊ अशी प्रेमरुपी सदिच्छा व्यक्त करत येत्या काळात अशा पध्दतीने महिलांचे कार्यक्रम ठेवण्याची विनंती केली. या कार्यक्रमाचे अंतर्गत वृक्ष भेट महिलांना द्यावा म्हणजे मनोज दादांची सदैव आठवण प्रत्येकाच्या आयुष्यभर स्मरणात राहील आणि या कार्यक्रमात महिलांच्या अलोट गर्दी बद्दल कौतुक करत मनोजदादा घोरपडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मनोज दादा घोरपडे म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व महिला होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्ताने आज एकत्र मोठ्या संख्येने येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. यापुढेही अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी सांगितलेल्या रोप भेट व महिलांसाठी विधायक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगून सर्व उपस्थित जनसमुदायांचा व महिलांचे विशेष आभार मानले.
महिलांनी मनोजदादा घोरपडे यांचे मानले आभार…!
मत्यापूर (ता. सातारा) येथे महिलांना महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा खेळ मनोरंजनाचा’ होम मिनिस्टर हा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त ठेवल्याबद्दल हजारोच्या संख्येने आलेल्या महिलांनी विशेष: भाजप नेते मनोजदादा घोरपडे यांचे विशेष आभार मानले. आपल्या भावाकडे माहेरी आल्याचे भावनिक व सह्दयी बोलून दाखवत होम मिनिस्टर कार्यक्रमात सर्व महिलांनी सहभाग नोंदविला. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पहील्यांदाच होम मिनिस्टर कार्यक्रमामुळे आनंददायी अनुभव आला असल्याचे महिलांनी बोलून दाखवले.