ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

मल्हारपेठ ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला

कराड | विशाल वामनराव पाटील
पाटण तालुक्यात मरळी, मुंद्रुळ कोळे आणि मल्हारपेठ या तीन मोठ्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम लागला आहे. रविवार दि. 5 रोजी मतदान तर सोमवारी दि. 6 रोजी निकाल लागणार आहे. या तीन मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्षवेधी निवडणूक ही मल्हारपेठ ग्रामपंचायतीची असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी सरपंचपद काहीही करून आपल्याकडेच ठेवण्यासाठी दोन्ही गटाकडून चंग बांधला गेला आहे. यामध्ये तरूण उमेदवार किरण दशवंत विरोधात मोहन दशवंत असा थेट सामना होणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिंदे शिवसेना गटाविरोधात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम आणि राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकर यांच्यासाठी मल्हारपेठ ग्रामपंचायत निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे शिंदे गट सत्तांतर करणार की महाविकास आघाडी सत्ता अबाधित ठेवणार हे सोमवारी ठरणार आहे.

पाटण तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी पॅटर्न मल्हारपेठमध्ये राबविला आहे. मल्हारपेठच्या निवडणुकीत सदस्य पदासाठीही दोन्ही पॅनेलकडून तरुणांना संधी दिली आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी देसाई गटाकडून तरूण उमेदवार किरण दशवंत यांना संधी दिली आहे. सध्या सोशल मीडियातून प्रत्येक उमेदवाराचा प्रचार चर्चेचा ठरत आहे. सरपंचपदासाठी ओबीसी आरक्षण असल्याने शिवसेनेचे किरण दशवंत व राष्ट्रवादीचे मोहन दशवंत यांच्यात सरळ लढत होत आहे. दोन्ही गटाकडून विकासकामे केल्याचा दावा केला जात आहे.

ग्रामपंचायतीच्या बारा जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीची मल्हारपेठ विकास आघाडी पॅनेलमधून सदस्यपदासाठी वॉर्ड एकमधून अमोल शेटे, संगीता भिसे, रेश्मा कदम, वॉर्ड दोनमधून दादासो पानसकर, रेश्मा मोहिते, प्रियांका पानसकर, वॉर्ड तीनमधून वैभव पाटील, जयश्री पानसकर, वॉर्ड चारमधून धीरज पवार, शिवाजी पोळ, सुरेखा फल्ले हे उमेदवार आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिवसेना शिंदे गटाचे श्री. निनाई – नवसरी परिवर्तन पॅनेलचे वॉर्ड एकमधून नितीन दशवंत, सुनीता साठे, अनिता कदम, वॉर्ड दोनमधून सूर्यकांत पानस्कर, विद्या जाधव, शुभांगी कदम, वॉर्ड तीनमधून पुरुषोत्तम चव्हाण, शुभांगी पानस्कर, क्रमांक चारमधून अनिल पानस्कर, सुनील नेटके, अश्विनी पवार हे उमेदवार आहेत.

निवडणुकीसाठी भलेमोठे बॅंनर- साऊंड सिस्टिम
मल्हारपेठ ग्रामपंचायत निवडणूक ही विधानसभेच्या लढवली जात आहे. आमदारकीला ज्या पध्दतीने भलेमोठे बॅंनर लागतात, तसे गावातील चाैका- चाैकात तसेच कराड- पाटण रोडवर लागलेले आहेत. प्रचारासाठी खास साऊंड सिस्टिम असलेली वाहने गल्लोगल्ली फिरवली जात आहेत. शेवटचे दोन दिवस मतदानाला राहिले असल्याने नेत्यासह कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागलेले पहायला मिळत आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी आख्ख दशवंत कुटुबिय कामाला लागलेले दिसत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker