मोदी, शहा नव्हे तर या दोन व्यक्तींना नितीन गडकरींनी वाकून नमस्कार केला
नाशिक | गोपीनाथ मुंडे यांचे सर्वात मोठे योगदान हे भारतीय जनता पार्टीसाठी आहे. त्याच्यामुळे पक्षाचा विस्तार झाला. 1992-93 साली गोपीनाथ मुंडे यांनी मोठी संघर्ष यात्रा काढली. संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी जागवला, बाळासाहेब ठाकरेचं नेतृत्व आणि गोपीनाथराव मुंडेची संघर्ष यात्रा या दोन्हीच्या सहयोगातून महाराष्ट्रात 1995 साली शिवशाहीचे राज्य आले. गोपीनाथ मुंडे हे आपले नेते होते, असं नितीन गडकरी म्हणाले, आपण भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर इंदूरमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. त्यावेळी आपण अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दोनच व्यक्तींना वाकून नमस्कार केलेला. त्यातले एक लालकृष्ण आडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे होते.
नांदुर शिंगोटे (जि. नाशिक) येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री भारती पवार, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, दादा भुसे यांच्यासह राज्यातील विविध नेते यावेळी उपस्थित आहे.
3600 कोटीचे काम 1600 कोटीत केलं
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेकरता रिलायन्सचं टेंडर 3600 कोटी त्याकाळातलं आलं होतं. मी गोपीनाथ यांच्याकडे गेलो आणि म्हणलो की हे 3600 कोटींचं टेंडर खूप मोठं आहे. यामुळे आपल्यावर टीका होईल. आपण हे रिजेक्ट करु. त्यावेळी त्यांनी माझ्याकडून सगळे कागदपत्रे घेतले आणि ते रिजेक्ट केलं. त्यानंतर 3600 कोटींचं काम आम्ही 1600 कोटींमध्ये केलं” आजचे ते 20 हजार कोटी रूपये होतील, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.