काॅंग्रेसमधील वरिष्ठांशी माझे मतभेद नाहीत : आ. सत्यजित तांबे
कराड | काँग्रेसमधील वरिष्ठांशी माझे कोणाशी मतभेद नाहीत. निवडणुक काळात काही ठराविक लोकांनी जे गैरसमज निर्माण केले, त्यामुळे पक्षातून मला बाहेर काढलं. त्या विरोधातील आमची लढाई होती आणि ती अजून चालू आहे. परंतु माझी नाराजी दूर व्हायला मला कोणी बोलावलं तर चर्चा होईल आणि चर्चा झाली तर नाराजी दूर होईल. पण अजून मला कोणी बोलवलंच नाही, असे वक्तव्य नाशिक पदवीधर मतदार संघाचे नूतन आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे आले होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी युवक काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहराध्यक्ष ऋतुराज मोरे, शिवाजी विद्यापीठचे सिनेटचे सदस्य अमित जाधव, अभिजीत पाटील, राहूल पवार आदी उपस्थित होते.
आ. सत्यजित तांबे म्हणाले, निवडणुकीच्या काळात काही ठराविक लोकांनी जे गैरसमज निर्माण केले त्याच्यातून पक्षाने माझ्यावर कारवाई केली. पक्षाने मला बाहेर काढलं असलं तरी आम्ही पिढ्यानं पिढ्या काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहोत. आमच्या परिवाराला काँग्रेसमध्ये 100 वर्ष होत आहेत. माझं 22 वर्षाचे आहे ते विद्यार्थी चळवळीपासून युवक चळवळीपासून काँग्रेसमध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला ढकलून देण्याचा जो प्रयत्न काही ठराविक लोकांकडून झाला त्याचे विरोधाची ती आमची लढाई होती आणि ती अजून चालू आहे माझी नाराजगी दूर व्हायला मला बोलावलं तर चर्चा होईल आणि चर्चा झाली तर नाराजगी धरून अजून मला कोणी बोलवलंच नाही.