शिवेंद्रराजेंना पाडणार अन् मग रिंटायरमेंट घेणार : राष्ट्रवादीच्या नेत्याचा इशारा
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मी विधानसभेची तयारी चालू ठेवली आहे. गेल्या वर्षी उमेदवार मी होतो, यावेळीही मीच असणार आहे. आमदार शिवेंद्रराजेंना पाडून मी रिंटारमेंट घेणार आहे, असा इशारा राष्ट्रवादीचे सातारा- जावलीचे नेते दिपक पवार यांनी दिला आहे. मेढा बाजार समितीच्या निवडणुकीनंतर आ. शिंवेंद्रराजेंनी दिपक पवार यांनी रिंटायमेंट घ्यावी, असे वक्तव्य केले होते, त्याला प्रत्युत्तर दिले.
सिल्वर अोक येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी सातारा- जावली मतदार संघात कशा पध्दतीने बांधणी करायची, यासंबधी चर्चा झाली. त्यामुळेच कुडाळ येथे शरद पवार साहेबांची सभा आयोजित केली आहे. या सभेच्या माध्यमातून एक चांगलं वातावरण निर्मिती होणार आहे. शिवेंद्रराजेंना पाडणार अन् मग मी रिटायरमेंट घेणार रिटायरमेंट सगळ्यांनाच घ्यावी लागते, असेही दीपक पवार यांनी टोला लगावला.
सातारा- जावली विधानसभा मतदार संघात 2019 साली विधानसभेला भाजपाकडून आ. शिवेंद्रराजे विरोधात राष्ट्रवादीचे दिपक पवार अशी लढत झाली होती. त्यानंतर जिल्हा बॅंकेत व बाजार समिती निवडणुकीत दोन्ही नेते आमनेसामने आलेले पहायला मिळाले. त्यामुळे आता होणाऱ्या सभेत शरद पवार व दिपक पवार काय बोलणार याकडे लक्ष लागून आहे.