कराड- पाटण मार्गावर चोरटी दारू वाहतूक पकडली : सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

कराड | कराड – पाटण मार्गावर खूशबू ढाबा येथे काही लोकांनी अडवलेल्या अोमनी गाडीतून चोरटी वाहतूक करणाऱ्यावर कराड शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 1 लाख 28 हजार 660 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद वैभव शंकर पवार (वय- 30) यांनी दिली आहे.
याबाबतची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी वाॅकी टॉकी वरून खुशबू ढाबा येथे काही इसमांनी फोर व्हिलर अडवली असून सदर ठिकाणी तात्काळ जाण्यास सांगितले. सदर ठिकाणी होमगार्ड निलेश साळुंखे आणि काॅन्सटेबल वैभव पवार गेले असता शुभम कदम (वय- 26, रा. गोवारे, ता. कराड, आदित्य डुबल (वय- 28, रा. हजारमाची, ता. कराड) आणि प्रितम राजाराम शिंदे (वय- 32, रा. विरवडे, ता. कराड) यांनी ओमणी कार (MH- 12- MB- 8539) ही गाडी अडवून ठेवली होती. सदरची गाडी अनिरुद्ध विजय कोळेकर (वय- 23, रा. कोळेवाडी, ता. कराड) हा चालवित होता. गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये देशी दारुचे बॉक्स मिळून आले. त्याच्याजवळ दारू विक्रीचा परवाना नसल्याचे त्याने सांगितले.
सदरील कारवाईत एक अोमणी गाडी, बेकायदेशीर विनापरवाना देशी आणि इंग्लिश दारू आढळून आली. चालकांच्या ताब्यातून एकूण 1 लाख 28 हजार 660 रूपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.