कराड येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमातून दीड हजार लोकांना शासकीय योजनांचा लाभ
अजय पावसकर मित्र समूहाकडून कार्यक्रमाचे आयोजन
कराड | शहरातील कृष्णाबाई मंगल कार्यालयात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध 25 हून अधिक शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शासनाच्या या उपक्रमांचे अजय पावसकर मित्र समूहाने आयोजन केले होते. कराडचे तहसीलदार विजय पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमातून तब्बल दीड हजाराहून अधिक लोकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.
यावेळी भाजपचे लोकसभा प्रभारी डाॅक्टर अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि तहसीलदार विजय पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना अनेक योजनांतील लाभाचे दाखले तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमास कराड भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, शिवसेना तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, माजी जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, मुकुंद चरेगावकर, प्रमोद शिंदे, स्वाती पिसाळ, राजेंद्र माने, राहूल यादव, रूपेश मुळे यांच्यासह शहरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डाॅ. अतुल भोसले म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार वेगवाग विकास करत आहे. लोकांना जास्तीत जास्त सोयी- सुविधा देण्यासाठी कटिबध्द आहे. त्यामुळेच शासन आपल्या दारी उपक्रम ठिकठिकाणी राबवला जात असून तो यशस्वी होत आहे.