पाटण तालुक्यात लोकांचा बिबट्याला घेराव : बिबट्याला पळविले

पाटण| पाटण तालुक्यातील केरळ गावात एक बिबट्याचे दर्शन सर्व गावकरी यांना मिळाले. तो बिबट्या अशक्त अवस्थेत असून पाण्याच्या शोधात हा बिबट्या गावात आला असल्याचा सध्या संशय आहे. एक तर बिबट्या म्हंटले तर जिथे लोकांची तारांबळ उडते. मात्र, या गावात बिबट्याला ग्रामस्थांनी घेराव घातला अन् बिबट्या हतबल झालेला पहायला मिळाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शनिवारी दुपारी एक बिबट्या केरळ गावाकडे येताना काही लोकांना दिसला. लोकांची घाबरगुंडी उडाली होती, मात्र बिबट्या हा लोकांना पाहुणे कोणतीच हालचाल व हल्ला करताना दिसून आल्याने लोक त्याच्याकडे धाव घेऊ लागले. केरळ गावातील ग्रामस्थांनी बिबट्याकडे गाव घेतल्यानंतर तो न पळता एकाच जागी बसलेला दिसून आला. यावेळी सदरील बिबट्या हा अशक्त असल्याचे लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला.
बिबट्या चपळ प्राणी असताना या बिबट्यास चालणे सुध्दा मुश्किल झाले असल्याचे दिसून आले. वन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत सदरली बिबट्यास ताब्यात घेतले आहे. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी आता करण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.