पुसेसावळीत जाळपोळ, दगडफेकीनंतर छ. उदयनराजें पोहचले… जिल्ह्यात अनेक ठिकाणी इंटरनेटसेवा बंद
पोलिसांचे शांततेच आवाहन
सातारा | सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी जमावकडून दगडफेक आणि जाळपोळ केल्याची घटना रात्री उशिरा घडली. या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. अशावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुसेसावळी येथे तातडीने भेट देत लोकांना शांततेच आवाहन केलं आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
पुसेसावळी येथील शाही मशिदीत उदयनराजे यांनी हिंदू- मुस्लिम समाजातील लोकांच्या भेटी घेवून या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पुसेसावळीत तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व परिस्थितीवर पोलिसांचे नियंत्रण असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
शाही मशिदीतून छ. उदयनराजे म्हणाले….
मनापासून दुःख वाटतं ज्या छत्रपतींनी सर्वधर्म समभावाची भावना जपली. स्वतःच्या स्वार्थापोटी आज कोण काय करत असेल. आपण आजारी असताना ब्लड कोणाचा आहे, याचा विचार करत नाही. आपल्या सर्वांचे ब्लड एकच आहे. मी जात-पात मानतच नाही. प्रत्येक लोकांनी जातीचा फायदा स्वतःच्या स्वार्थासाठी घेतला. मी व्यक्ती केंद्रित माणूस नाही, मला जे वाटतं ते मी बोलतो. हिंदू काय अन् मुस्लिम काय यांना कुठे पाठवायचं जन्माला येथं आलेले आहेत. त्यांनी जायचं कुठं. एक ना एक दिवस सर्वांना स्मशानभूमीत जायचे तोपर्यंत तरी नीट वागा. सर्वांनी बंधू भावाने एकत्र राहिला पाहिजे. आज एकाची हत्या झाली, त्यांचं नुकसान कोण भरून देणार. तेव्हा सर्व शांतता राहू द्या एवढंच मी सांगतो, असे म्हणत सर्वांना शांततेच आवाहन केलं आहे.