सातारा जिल्ह्यात टपाल विभाग ”या” पदासाठी करणार थेट मुलाखतीद्वारे नेमणूक

सातारा । टपाल जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजने अंतर्गत असणाऱ्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणुक प्रवर अधिक्षक डाकघर, सातारा विभाग सातारा 415001 यांच्या मार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 10 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज पाठविताना उमेदवाराने आवश्यक कागद पत्रे, जन्म तारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रतेची आवश्यक कागदपत्रे तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याबाबतची कागदपत्रे पाठवावी. अधिक माहितीसाठी वरिष्ठ अधिक्षक डाकघर सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
टपाल विभागात विमा प्रतिनिधी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा असणार नाही. केवळ अर्ज विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे. त्यानंतर मुलाखतीची तारीख दिली जाईल, त्या दिवशी थेट मुलाखत होईल. त्यानुसार निवड करण्यात येणार आहे.