साताऱ्यात राष्ट्रवादी आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करेल : अजित पवार
सातारा | सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, परंतु आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) याचेही आमदार आहेत. त्यामुळे काही प्रमाणात ही अोळख आता कमी होत आहे. यावर आत्मचिंतन करू, आत्मपरिक्षण करू, असे म्हटले आहे. तसेच अंतर्गत कुरघोड्या कोणी करत असेल तर त्याला खडे बोलही सुनावले जातील असे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी कोयनानगर येथे माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब सोळस्कर, सत्यजित पाटणकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याठिकाणी कोयना विभागातील लोकांच्या अडचणी अजित पवार यांनी जाणून घेतल्या. तसेच वेगवेगळी निवेदनही स्विकारली.
पाटण विधानसभा मतदार संघात गावोगावी जंगी स्वागत
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मुक्काम विक्रमसिंह पाटणकर यांच्या फाॅरेस्ट एस्केपमध्ये होता. सकाळी 8.00 वाजता फाॅरेस्ट एस्केपमध्ये असलेल्या काही पर्यटकांशी त्यांनी संवाद साधला. तेथून ते कोयनानगर येथील चेंबरीमध्ये आले. कोयनानगर येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधून सत्कार स्विकारला. तेथून संगमनगर धक्का, पाटण शहर, नवारस्ता, मल्हारपेठ, विहे, तांबवे फाटा, तांबवे येथे अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले.