वारूंजी सोसायटीत काका- बाबा गटाची सत्ता

कराड | वारूंजी विकास सेवा सोसायटीच्या निवडणूकीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर गटाच्या शेतकरी विकास पॅनेलने सत्ता मिळवली. तर विरोधी शेतकरी सभासद विकास पॅनेलला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. जे. शेळके यांनी काम पाहिले.

भाजपचे डाॅ. अतुल भोसले विरूध्द काका- बाबा गटात पंचवार्षिक निवडणुकीसाठी लढत झाली. विजयी शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, माजी सरपंच महादेव पाटील यांनी केले. अत्यंत चुरशीच्या लढतीत अवघ्या 1 जागेवर विरोधकांना समाधान मानावे लागले.

विजयी उमेदवार व त्यांची मते कंसात- सर्वसाधारण मतदारसंघातून – मुकुंद काशिनाथ पाटील (344), जयवंत विश्वनाथ पाटील (336), सुरेश तुकाराम पवार (322), गणेश बाबासो पाटील (315), विक्रम तुकाराम चव्हाण (304), विजयकुमार बंडू पाटील (283), धनंजय सुरेश पाटील (260),तर विरोधी गटातील आनंदराव चंद्रू पाटील (270), महिला राखीव मतदार संघातून- सुमन व्यकंट पाटील (309), सुनंदा रमेश धुमाळ (283). अनुसूचित जाती/ जमाती मतदार संघातून- आनंदराव शिवराम थोरवडे (326), इतर मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून- गणी गुलाब सुतार (बिनविरोध), विमुक्त जाती प्रवर्गातून- दिपक रामचंद्र भांडलकर (320).



