ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यविधानसभा 2024सातारा

भाजपाच्या पहिल्याच यादीत डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी जाहीर

कराड :- भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर झाली असून या यादीत कराड दक्षिण मधून डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या 99 उमेदवारांमध्ये सातारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांनी भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद वाढवली आहे. तसेच या मतदार संघात व जिल्ह्यात भाजपाला बळकटी व ताकद देण्याचे काम डॉ. भोसले यांनी अनेक वेळा केले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्य देत विजयी करण्यात महत्त्वाचा हातभार लावला होता. तसेच लोकसभा प्रभारी म्हणूनही डॉ. अतुल भोसले यांनी चांगले काम केल्याने त्यांना पहिल्याच यादीत भाजपाने संधी दिली आहे. डॉक्टर अतुल भोसले यांची कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.

सातारा जिल्ह्यातून सातारा, माण आणि कराड दक्षिण या मतदारसंघातील उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर करण्यात आले आहे. सातारा विधानसभा मतदारसंघातून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून डॉ. अतुल भोसले आणि माण- खटाव विधानसभा मतदारसंघातून जयकुमार गोरे यांना संधी देण्यात आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker