कराड शहरात सोनाराला सोने विकण्यास आलेल्या चोरट्याला अटक : घरफोडी उघड

कराड | शहरातील बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने अटक केली. बन्या उर्फ विकास अशोक वाघमारे (रा. बुधवार पेठ, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहरातील बुधवार पेठेत 6 सप्टेंबर रोजी घरफोडीचा प्रकार घडला होता. बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात घुसलेल्या चोरट्याने सुमारे एक लाखाचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शहरातील मुख्य बाजारपेठेत उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशी काळे, कुलदीप कोळी, संतोष पाडळे यांच्यासह कर्मचारी गस्त घालत असताना. एका सराफ दुकानात बन्या उर्फ विकास वाघमारे हा संशयास्पदरित्या सोने विक्रीसाठी आल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी जाऊन संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने बुधवार पेठेतील घरफोडीची कबुली दिली. तसेच त्याने चोरूलेले संपूर्ण सोन्याचे दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बागंर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक डांगे, सफाै रघुवीर देसाई, सफाै संजय देवकुळे, पोलीस हवा. शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पो.शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, रईस सय्यद, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.