आरोग्यताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कराडच्या सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये ‘मधुस्नेह’ या डायबिटीज केअर क्लिनिकचे उद्घाटन

कराड |  कराड आणि सातारा जिल्ह्यातील लोकांसाठी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड येथे ‘मधुस्नेह’ या अत्याधुनिक डायबिटीज केअर क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. सातारा जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना मधुमेहासाठी विशेष काळजी आणि यशस्वी उपचार देण्यासाठी हे क्लिनिक समर्पित असेल. या क्लिनिकचे उद्घाटन पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटल्सचे एंडोक्रिनोलॉजी आणि मधुमेह विभागाचे संचालक असणाऱ्या डॉ. उदय फडके यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी सह्याद्रि हॉस्पिटल कराडचे संचालक दिलीप चव्हाण, सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील राव, जनरल मॅनेजर ऑपरेशन्स डॉ. वेंकटेश मुळे, कॅन्सलटिंग फिजिशियन तथा मधुमेह तज्ञ डॉ. महेश देशमुख आणि कन्सलटिंग फिजिशियन डॉ. राम देसाई हे उपस्थित होते.

मधुमेह हा भारतासह जगभरातील लोकांच्या आरोग्याच्या चिंतेचा प्रमुख विषय बनला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते, भारतात 77 दशलक्ष मधुमेही रुग्ण आहेत आणि येत्या काही वर्षांत ही संख्या अधिक वाढण्याची धोका आहे. सर्वदूर पसरलेल्या या आजारापासून सातारा जिल्हा आणि त्याचा परिसर देखील आता अस्पर्शीत राहिलेले नाही. मधुमेही रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मधुमेह व्यवस्थापनाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष आरोग्य सुविधांची तातडीची गरज आहे. ‘मधुस्नेह’ डायबिटीज केअर क्लिनिक या परिसरातील ही गंभीर पोकळी भरून काढू शकते आणि एकाच छताखाली सर्वसमावेशक सुविधा देऊ शकते.

मधुमेह विभागाचे संचालक डॉ. उदय फडके म्हणाले, “मधुमेहाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांना सर्वोत्कृष्ट काळजी आणि सहाय्य मिळावे यासाठी वैद्यकीय समुदायाकडून सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथील ‘मधुस्नेह’ डायबिटीज केअर क्लिनिक मधुमेही रुग्णांना सुयोग्य काळजी प्रदान करण्यात, त्यांना निरोगी जीवन जगण्यास मदत करेल.”
मधुमेही रुग्णांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित असलेल्या या क्लिनिकची रचना अत्यंत कुशल आशा डॉ. महेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विचारपूर्वकपणे तयार करण्यात आली आहे. डॉ. उदय फडके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसमावेशक प्रशिक्षण घेतलेल्या डॉ. देशमुख यांना ‘मधुस्नेह’ क्लिनिकमूळे मधुमेह व्यवस्थापनासाठी रुग्णांनी वैयक्तिक काळजी आणि सर्वांगीण दृष्टीकोन स्वीकारण्याची आशा आहे.

सातारा जिल्हा तसेच परजिल्ह्यातील रुग्णांना या अत्याधुनिक डायबिटीज केअर क्लिनिकचा लाभ घेत यावा, यासाठी 25 जुलै ते 31 ऑगस्ट 2023 या दरम्यान रु.999/- चे विशेष सवलत पॅकेज रुग्णांसाठी या प्रसंगी जाहीर करण्यात आले. 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker