नोकरी संदर्भ : तलाठी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर, सविस्तर माहिती पहा
हॅलो न्यूज नोकरी । राज्यात तलाठी (गट- क) पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. या पदासाठी दि. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत परिक्षा होणार आहे. अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांना परिक्षा केंद्राचे नाव किमान 10 दिवस आधी कळविण्यात येणार आहे. परिक्षा तीन सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली आहे.
राज्यभरातून तलाठी पदाच्या 4466 पदासाठी 11 लाख 10 हजार 53 उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. परिक्षा सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि सायंकाळी 4.30 ते 6.30 या तीन सत्रांत वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा केंद्र तीन दिवस अगोदर प्रवेशिके समजणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे.
टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येत असून तलाठी पदासाठी एकूण 200 गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे, असेही समन्वयक आनंद रायते यांनी सांगितले.