मसूरला राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाकडून समाजकंटकांचा जाहीर निषेध

मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांना काही समाजकंटकांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी आज मसूर (ता. कराड) येथे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील व सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ क्रीडा समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक लहूराज जाधव, प्रा.कादर पिरजादे, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, माजी सरपंच दिनकर शिरतोडे, प्रकाश माळी, ग्रा.प. सदस्य रमेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मसूर शहराध्यक्ष प्रशांत पाटील, अल्पसंख्यांचे मसूर शहराध्यक्ष जमीर मुल्ला.,वाण्याच्यावाडीचे सरपंच शरद चव्हाण, सनी रामगुडे, विकास पाटोळे, जगदीश वेल्हाळ, सयाजी जाधव, प्रताप जगदाळे, विष्णुपंत जाधव, गोपीनाथ कांबळे, किसनराव जाधव, व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मानगसिंगराव जगदाळे म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष असो कि कोणताही पक्ष असो तिथे शरद पवार साहेब यांना एक विशेष स्थान आहे. देशातील कोणत्याही अडचणीच्यावेळी महाराष्ट्रातील हे व्यक्तिमत्व सदैव पुढाकार घेत आले आहे. तेव्हा पवार साहेबांना धमकी देणाऱ्या समाजकंटकांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.